जागे व्हा मुलांनो, जागे व्हा!
नमस्कार मी प्रथमेश प्रविण नाईक, एक लेखक असून आजचा हा ब्लाँग अत्यंत गंभीर विषयावर लिहित आहे.
माझे बरेचसे ब्लाँग सामाजिक मुद्द्यांवर असतात, तर हा ही त्यापैकी एक आहे.
आजकालची पिढी ही इतकी हुशार आहे कि ते त्यांची हुशारी नको तिथे लावत आहे.
आज मी बाहेरून घरी जात होतो तेव्हा माझ्या बाजूला एका शाळेच्या नोटिस बोर्डावर अभद्र शब्द व चित्रण केलं होतं कोणीतरी.
ते पाहून राग आला पण वाईट सुद्धा वाटलं. तर तो शब्द ह्याप्रमाणे होता - "फक ____(लींगाचं(मनुष्य) चित्र)".
मी तो शब्द व चित्रण बघतच बसलो आणि विचार करु लागलो कि हे कोणी केलं असावं व का केलं असावं!
शक्यतो मुलांनेच केलं असावं, पण का केलं असावं हे मात्र देवालाच ठाऊक.
आता प्रश्न पडतो की ह्यात नेमकी चूक कोणाची? त्या मुलाची व त्याच्या आई वडील व शिक्षकांची? तर उत्तर आहे - वाईट संगतीची!
मला सांगा, आई वडील किंवा मग शिक्षक असं शिकवतील का? नाही न ! सगळ्या पालकांना हेच वाटतं की आपला मुलगा चांगलं शिकावं व मोठा व्हावं.
ते पाहून खरंच मन जड झालं. आता तुम्ही म्हाणाल कि पुरावा काय ह्या लेखनाचा, तर तो तुमचा विश्वास माझ्यावरचा.
तो फोटो बघण्यासारखा मुळीच नव्हता तर त्याचा फोटो दाखून काय करू?
मी शक्यतो थेट घरीच जातो पण माहीत नाही कसं तिथे लक्ष गेलं आणि डोकच फिरलं!
तर हेतू काय ह्या लेखचा तर असा की काही शिकवण द्या मुलांना की शाळेत किंवा कुठेही कसं वागायचं. दोन मिनीट बसा आणि बोला त्यांच्याशी.
अपशब्द तर काय आजच्या जगात सगळेच देतात जे चूकिचं तर आहेच, पण त्याहून जास्त चूकिचं म्हणजे ते आपण कुठे देतो ह्यांचं भान नसणं!
Comments