महादेवांची इच्छा

आज सोमवार दिनांक ३० मार्च २०२६, मी प्रथमेश प्रविण नाईक, हा ब्लाॅग लिहित आहे. 

मी हा ब्लाॅग इंग्रजीत सुद्धा लिहिला होता. पण तेव्हा मी काही न म्हणता प्रार्थना करुण निघालो व घरी येऊन ब्लाॅग लिहीला होता. 

पण आज म्हटलं गप्प बसायचं नाही! आज एक वेगळ्याच बाई माझ्याआधी पूजा करण्यास उभ्या होत्या, त्याचं ताट वगैरे घेऊन. मी नेहमीप्रमाणे दोन बेल पान घेऊन गेलो आणि ते शंकराच्या पिंडीवर अर्पण करून पाया पडू लागलो. 

पण ह्या बाईंची भलतीच भक्ती होती. त्यांनी सर्वे बेल पान, फूलं इत्यादी काढून, शिवलिंगाच्या वरच्या भागाला उचलून ते पाण्याने धुवू लागले. 

माझं डोकंच फिरलो! मी खरंतर जास्त कुठे बोलत नाही आणि मला मंदिरात ही वाद घालायचा नव्हता, पण मला राहवलं नाही आणि मनात म्हटलं की जर आज नाही बोल्लो तर कधीच बोलता येणार नाही. 

तर मी राग न‌ दाखवता नम्रपणे विचारलं की -
 "तुम्ही हे काय करत आहात".
"मी बेल पान ठेवून एक मिनिट सुद्धा झाली नाहीत आणि तुम्ही माझ्यासमोरच काढत आहात?, आणि तेही मी पाया पडत असताना!" 

खरं तर मी पाया पडत होतो आणि तेव्हाच ते काढत होते. माझ्या मागे एक बाई होत्या, त्यांना सुद्धा पटलं मी जे बोल्लो ते! 

तेही म्हणाले - "असं करायला नको हवं होतं"

मी काही न म्हणता पाया पडून निघालो व मनात म्हटलं - "बुद्धी दे शंकरा!, बुद्धी दे! ह्यांनाच नाही तर ह्यांच्या सारखे सर्व भक्तांना बुद्धी दे!" 

हा जर तुम्ही ब्लाॅग वाचत असाल तर एका महादेव भक्ताला नक्कीच शेयर करा ही विनंती 🙏

तुमचाच लाडका लेखक,
प्रथमेश प्रविण नाईक 

Comments

Popular posts from this blog

The Kid : KBC JUNIORS

AN UNFORGETTABLE FORTUNATE DAY OF MY LIFE

Stampede - A very crucial topic